0
समूहदर्शक शब्द. 1) काजूची,माशांची – गाथण 2) किल्ल्यांचा – जुडगा 3) केसांचा – झुबका,पुंजका 4) केसांची – बट,जट 5) केळ्यांचा – लोंगर , घड 6) खेळाडूंचा – संघ 7) गवताचा – भारा 8) आंब्यांच्या झाडांची – राई 9) उतारुंची – झुंड ,झुंबड 10) उपकरणांचा – संच 11) उंटांचा, लमाणांचा – तांडा 12) करवंदाची – जाळी 13) गवताची – गंजी , पेंढी 14) गाईगुरांचे – खिल् 15) गुरांचा – कळप 16) चोरांची, दरोडेखोरांची – टोळी 17) जहाजांचा – काफिला 18) तारकांचा – पुंज 19) ताऱ्यांचा – पुंजका 20) नारळांचा - ढीग 21) नोटांचे – पुडके 22) पक्ष्यांचा – थवा 23) प्रवाशांची – झुंबड 24) फुलझाडांचा – ताटवा 25) फुलांचा – गूच्छ 26) बांबूंचे – बेट 27) भाकऱ्यांची ,रुपयांची – चवड 28) मंडक्यांची – उतरंड 29) प्रश्नपत्रिकांचा – संच 30) पाठ्यपुस्तकांचा – संच 31) पालेभाजीची – गड्डी,जुडी 32) द्राक्षांचा – घड,घोस 33) दुर्वांची – जुडी 34)धान्यांची – रास 35) नाण्यांची – चळत 36) पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी 37) पुस्तकांचा,वह्यांचा – गट्ठा 38) पोत्यांची,नोटांची – थप्पी 39) फळांचा – घोस 40) माणसांचा – जमाव 41) वाद्यांचा – वृंद 42) विटांचा, कालिंगडांचा – ढीग 43) विद्यार्थ्यांचा – गट 44) विमानांचा – ताफा 45) मुलांचा – घोळका 46) मुंग्यांची – रांग 47) मेंढयांचा – कळप 48) लाकडांची,उसांची – मोळी 49) वस्तूंचा – संच 50) वेलिंचा – कुंज 51) साधूंचा – जथा 52) वानरांची - टोळी 53) घरांची - चाळ 54) ढगांचा - घनमंडल 55) सैनिकांचे/सैनिकांची - तुकडी,पथक,फलटण 56) हत्तींचा – कळप 57) हरिणांचा – कळप 58) मातीचा ,विटांचा - ढिगारा 59) वाळूचा - ढीग

Post a Comment

 
Top