0

विषय : ई-लर्निंग फायदे/तोटे/असावे/नसावे

काही मुद्दे :-

१. ई-लर्निंग मध्ये वापरली जाणारी साधने :

टीव्ही, संगणक, मोबाईल, Tablet, इंटरनेट, प्रोजेक्टर, विविध software, Android applications, 

२. ई-लर्निंग फायदे : 

# मुले रस घेऊन शिकतात.

# बहुवर्ग अध्यापन पद्धतीत उपयोगी तसेच, एखाद्या मुलाची इयत्ते प्रमाणे अपेक्षित प्रगती झाली नसेल तर तुम्ही बाकीच्या मुलांना शिकवताना त्या मुलाला वेगळी ई लर्निंग साधने देऊन त्याच्याकडून तयारी करून घेऊ शकता.

# मुलांना संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने पीपीटी/व्हिडियो मार्फत समजावून देता येतात.

[उदा. त्सुनामी, प्रकाश संश्लेषण, अन्नसाखळी, भूगोलातील अनेक संकल्पना, इतिहासातील व्हिडियो, कविता,]

# मुलांना पाठांतर करावे लागत नाही - आकलन लवकर होते आहे.

# जास्त सोयीस्कर - लहान लहान भागांमध्ये शिकवू शकतो

# मोबाईल पद्धत - अर्थात स्क्रीन वर, tab वर, मोबाईल वर फिरत्या साधनांवर शिकवू शकता.

# ई-लर्निंग द्वारे पैशांची बचत देखील होऊ शकते. कमी मुले असतील किंवा जास्त मुले जरी असतील तरी वेगवेगळी ई-लर्निंग साधने घेण्यापेक्षा आळी पाळीने ही साधने वापरली जाऊ शकतात

# ई लर्निंग अर्थात संगणक, मोबाईल, आणि tab सारख्या साधनांचा वापर - त्यामुळे ओघाने शिकवताना नवनवीन पद्धती, विविध व्हिडियो, शैक्षणिक, मुलांसाठी मनोरंजनात्मक व्हिडियो, शैक्षणिक applications हे सर्व आले.

# २ शाळा जर इंटरनेट ने जोडल्या असतील, कनेक्टीविटी चांगली असेल तर एका शाळेत चाललेला अभ्यास दुसऱ्या शाळेतील मुले पाहू शकतात, त्यात सहभागी होऊ शकतात. हे जसे गावातल्या/जिल्ह्यातल्या २ शाळांमध्ये होऊ शकते तसेच २ वेगवेगळ्या देशांमधल्या शाळेमध्ये देखील होऊ शकते.

३. ई-लर्निंग काही शंका आणि समाधान :

[खालील शंकांवर ई-लर्निंग यशस्वी पणे राबवणाऱ्या शिक्षकांनी दिलेली उत्तरे]

# शंका १ = जर एखाद्या विद्यार्थ्याची ग्रहण क्षमता कमी असेल तर तो मागे पडू शकतो, कारण हे सर्व रेकॉर्डेड असते.

=> योग्य मुद्दा असून यावर त्या त्या शिक्षकाने काळजीपूर्वक लक्ष द्यायची गरज आहे. आपल्या वर्गात शिकणारी मुले, त्यांची अध्ययन क्षमता, त्यांना येणाऱ्या अडचणी याचा त्या त्या शिक्षकाला अभ्यास हवा, तर अशा आव्हानांवर मात करता येऊ शकते.

# शंका २ = सर्वच मुलांना ही पद्धत आवडेल असे नाही

=> आमच्या अभ्यासानुसार बहुतांशी मुले, रस घेऊन शिकतात. आम्ही १०० % ई-लर्निंग चे समर्थक नाही. पारंपरिक पद्धतीने/प्रयोगशील पद्धतीने  शिकवणे तितकेच महत्वाचे आहे.

# शंका ३ = पारंपरिक पद्धतीत/प्रयोगशील पद्धतीत  शिकवताना जर अडचणी आल्या तर मुले हात वर करून विचारू शकतात ते इथे होणार नाही.

=> हे शेवटी ई-लर्निंग आहे, कुठली online conference नाही त्यामुळे जेव्हा ई-लर्निंग द्वारे शिकवले जाते तेव्हा त्या त्या शिक्षकाने सतत आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या भावमुद्रांचा अभ्यास करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे.

# शंका ४ = तांत्रिक अडचणी

=> तांत्रिक अडचणी अनेक आहेत, त्यावर काम करणे गरजेचे. खास करून भार नियमनाच्या वेळेस ई-लर्निंग मध्ये अडचणी येऊ शकतात. तशी पर्यायी व्यवस्था हवी. laptop वर पीपीटी, आणि डाऊनलोड केलेले व्हिडियो असतील तर उत्तम, किमान अशा वेळेस या साधनांचा उपयोग होऊ शकतो. तेही शक्य नसेल तरी पारंपरिक पद्धत सोडू नये. भर पारंपरिक पद्धतीने/प्रयोगशील पद्धतीने  शिकवण्यावरच द्यावा.

# शंका ५ = तंत्रज्ञानावर प्रभुत्व

=> त्या त्या शिक्षकाचे, तंत्र ज्ञानावर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. म्हणजे ई-लर्निंग चा वापर करताना येणाऱ्या अडचणींचा समर्थ पणे सामना करता येईल. संगणक hang होणे, Software/Applications मध्ये बिघाड होणे, भारनियमनाच्या वेळेस योग्य निर्णय घेऊन, पर्यायी व्यवस्था करणे ईत्यादी.  

# शंका ६ = विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम

=> ई-लर्निंग चा वापर लोणच्या प्रमाणे/मीठा प्रमाणे करावा. तोंडी लावण्या पुरता. त्याचा अतिरेक होऊ देऊ नये. अनेक शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला १-१ तास दिला जातो, पूर्ण वेळ ई-लर्निंग चा वापर करण्याची संधी देखील मिळत नाही. त्यामुळे त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आपण टाळू शकतो. जसे डोळ्यांची जळजळ, एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहिल्याने पाठीवर येणारा ताण इत्यादी.

# शंका ७ = tab ने अक्षर सुधारू शकते का?

=> जसे पूर्वी म्हटले आहे कि, ई-लर्निंग हे एखादा विषय समजावून सांगण्याचे प्रभावी साधन आहे. त्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये. Tab जरी असला तरी पाटी-पेन्सिल आणि वही-पेन चे महत्व कमी होत नाही.

# शंका ८ = खर्च परवडत नाही

=> यासाठी सरकारने शाळांना मदत करणे गरजेचे आहे. तसेच लोकसहभागातून देखील मदत मिळवली जाऊ शकते. 

याचशिवाय काही शिक्षकांनी, मोबाईल, पुठ्ठ्याचे बॉक्स, भिंग याचा वापर करून कसा प्रोजेक्टर बनवता येईल याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच बाजारात आलेल्या नवीन ग्याजेट बद्दल देखील माहिती देण्यात आली, ई-लर्निंग साठी उपयुक्त अशा software बद्दल देखील शिक्षकांनी माहितीचे आदान प्रदान केले.

४. चर्चेचे फलित आणि सरकारची भूमिका - 

आपल्या मराठी शाळा अत्याधुनिक व्हाव्यात आणि त्यातून मातृभाषेतून शिक्षण मिळावे यासारखे दुसरे भाग्य नाही. यासाठी आज प्रत्येक शिक्षक झटतोय, ज्याला शक्य आहे तो पदर मोड करून मुलांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देतो आहे. एका तर शिक्षकाने यासाठी निधी गोळा करताना दारोदारी फिरून पोतराजाची भूमिका देखील केली आहे. 

निधीअभावी अनेक शाळा आज यासारख्या उपक्रमांपासून वंचित आहेत, तरी सरकारने ई-लर्निंग उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये राबवता यावेत यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असे आवाहन.

आभार,

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

www.shikshansanjivani.com

Post a Comment

 
Top