प्रार्थना || तुझ्या कुशीत जन्म ||
तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड!!धृ!!
किती साठवावे मनी क्षण ते सुखाचे
शिकावे शब्द आई तुझिया मुखाचे
किती जरी तू जपशील तळहातावरचा फोड
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड !! १ !!
कधी रागामध्ये मजवर टाकशील तू हात
कुठे लागतात पिलांना मांजरीचे दात......
किती जरी तू मजला करशील मारझोड
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड !! २ !!
एक सांगू का गं आई अनुभव सुखाचा ..
तुझ्या दुधापुढे फिका थेंब अमृताचा..
देव मानवापुढे तुला या जगात नाही जोड
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड !! 3 !!
तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड!!धृ!!
संकलन - www.shikshansanjivani.com
गीताची चाल - (सावन का महिना, पवन करे सोर)
लेखक कोण आहेत
ReplyDeleteSo heart ❤️ touching this lyrics 🥺🥺
ReplyDeleteलहानपनापासून मुखोदगत आहे! खूप छान 🌹
ReplyDelete